माझी शाळा यावर निबंध

माझी शाळा यावर निबंध (शाळेतील निबंध)

Mazi-shala-nibandh-marathi

माझी शाळा यावर निबंध - 

   " नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा  "

       खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते.
 
        माझी शाळा आमच्या घराजवळच आहे, शाळेत चालत जाण्यास बरोबर बारा मिनिटे लागतात. ही बारा मिनिटे मी जणू काही वा-यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बस मधे जव लागत.माझे कित्येक मित्र दूरवरून आमच्या शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो.

      आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.




        आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जातो. आईबाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे.
 
       ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळाही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनचमला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा यावर निबंध - १०० शब्द


     माझी चार मजल्यांची शाळा असून खूप सुंदर अशी इमारत  आहे. ही एक मंदिरासारखे आहे जिथे आपण दररोज शिक्षणासाठी जातो. शाळेत सर्वप्रथम आम्ही प्रार्थना करून वर्ग शिक्षकांना नमस्कार करतो,नंतर आम्ही अभ्यासक्रमानुसार वाचन सुरू करतो. मला दररोज शाळेत जायला आवडते. माझ्या शाळेत, शिस्तीला खूप महत्व आहे जी नियमितपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाळली आहे. मला माझ्या शाळेचा पेहराव खूप आवडतो. माझी शाळा माझ्या प्रिय घरापासून दोन किलोमीटर दूर आहे आणि मी शाळेत पिवळ्या रंगाच्या बस मध्ये जातो. शाळा अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे, जे प्रदूषण, आवाज, घाण पासून दूर आहे

माझी शाळा यावर निबंध - १५० शब्द


       माझी शाळा खूप चांगली आहे, ती लाल आणि तीन मजली आहे. मला दररोज योग्य पेहराव मध्ये माझ्या शाळेत जायला खूप आवडते. माझा शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ आहेत आणि आपल्याला शिस्त पाळण्यास शिकवतात. माझ्या शाळेच्या मुख्य दरवाजा ला लागून दोन लहान बगीचे आहेत जिथे अनेक प्रकारचे फुल झाडे आणि हिरवे गार गवती मैदान आहेत.

आमच्या शाळेत संगणकाची लॅब, दोन विज्ञान प्रयोगशाळे, मोठी लायब्ररी, एक मोठा खेळाचा मैदान, एक सुंदर स्टेज आणि एक स्टेशनरी स्टोअर आहे. माझ्या शाळेत, नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. स्त्री व पुरुष समेत माझ्या शाळेत ४५ पात्र शिक्षक, १५ सहाय्यक, एक प्राचार्य आणि ९ गेटकीपर आहेत. आमचे शिक्षक अत्यंत नम्र वर्तनाने एक अतिशय रचनात्मक आणि मनोरंजक पद्धतीने विषय स्पष्ट करतात. त्यामुळे आम्हाला विषय लगेच साध्य होत. ह्या शाळेत आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटत कारण इथेच मला माझे प्रिय मित्र मिळाले.


१५ टिप्पण्या:

  1. आयुष्याची परिपूर्ण शिकवन घेण्यासाठी व इतर सर्व विषयाबद्दल माहिती घेण्यासाठी.

    उत्तर द्याहटवा
  2. माझी शाळा या विषयावर छानसा निबंध वाचा या लिंक वरमाझी शाळा निबंध मराठी Click Here

    उत्तर द्याहटवा
  3. माझी शाळा निबंध 100 शब्दात, 200 शब्दात, 300 शब्दात, 400,500,700 आणि 1000 शब्दात जाणून घ्या आणि पैकी चे पैकी गुण मिळवा वाचा माझी शाळा निबंध

    उत्तर द्याहटवा
  4. माझी शाळा या विषयावर खूपच सुंदर शब्दात लिहिलेला निबंध येथे वाचा => माझी शाळा मराठी निबंध

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.