परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मावसभावास अभिनंदनाचे पत्र लिहा

परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मावसभावास अभिनंदनाचे पत्र लिहा
Parikshet yashwswi Zalyabaddl Mavasbhavas Abhindanche Patra 


 दि. २० जून, २०१८

२०. विजय भुवन
महाड


प्रिय राजीव
सप्रेम नमस्कार,

     आजच सकाळी वडिलांकडून समजलं कि तुला दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले,हे कळल्यावर मला  खूप आनंद झाला. म्हणून तुला हे खास अभिनंदनाचे पत्र लिहित आहे तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास दहावीतही तुला उत्तम गुण मिळतील ह्याची मला खात्रीच होती. लहानपणी तू म्हणायचास की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनेन. अजूनही तुझी तीच इच्छा आहे का? तसे असेल तर खूपच छान तू नक्कीच एक हुशार डॉक्टर होशील असे मला वाटते. तुझ्या आईबाबांनी तुझ्या अभ्यासासाठी परिश्रम घेतले आणि तुला चांगला पाठिंबा दिला म्हणून मी त्यांचेही अभिनंदन करतो.
    आता ह्यापुढे तुझा खरा अभ्यास सुरू होईल, हे जरी खरे असले तरी दहावीची परीक्षा हा त्या अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा असतो. तुझ्यापुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

तुझा मावसभाऊ
प्रशांत

३ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.