भारताचा भूगोल
भारताचा भूगोल
• महाराष्ट्र पठार – हे प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. सह्याद्रीपासून पूर्वेस सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र महादेव या डोंगररांगा महाराष्ट्र पठारावर आहेत.
• तेलंगण पठार – आंध्रप्रदेशातील हे पठार अग्निज खडकापासून बनलेले आहे.
• किनारी मैदानास महाराष्ट्रात कोकण, कर्नाटकात कानडा आणि केरळमध्ये मलबार म्हणतात.
• उडीसाच्या किनारी भागास उत्कल म्हणतात.
• आंध्र व तामिळनाडूच्या किनाऱ्याला कोरोमंडल म्हणतात.
• कर्नाटकातील शरावती नदीवरील जोग धबधबा प्रसिद्ध आहे.
• पूर्व वाहिनी नदी- महानदी, गोदावरी, कावेरी, कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.
• महानदी ही छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये उगम पावते. शिवनाथ ही तिची प्रमुख उपनदी आहे.
• राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था पणजी येथे आहे.
• वुलर हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे.
• 1 सागरी मैल = 1.85 किमी ( नॉटीकल मैल)
• उत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांना लू म्हणतात. तर राजस्थानात आंधी म्हणतात. पश्चिम बंगाल, उडीसा राज्यात नॉर्वेस्टर म्हणतात.
• वैशाख महिन्यात वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी, महाराष्ट्रात आम्रसरी, केरळ, कर्नाटकात चेरी ब्लॉसम (कॉफीस उपयुक्त)
• भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो.
• ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ आहे.
• जगात सर्वात जास्त पाऊस हा भारतातील मौसीनराम आणि चेरापुंजी येथे पडतो.
• मृदेचे 7 प्रकार आहेत.
- गाळची मृदा ही भारतातील उत्तम कृषी मृदा आहे. ही मृदा नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी खोऱ्यात आढळते.
- काळी मृदा ही बेसॉल्ट खडकाचे अपक्षय होऊन लयार झाली आहे. या मृदेला कापसाची काळी किंवा रेगूर मृदा म्हणतात.
- तांबडी मृदा ही अतिप्राचीन रूपांतरीत स्फटीकमय खडकापासून झाली आहे. लोहसंयुगाचे प्रमाण जास्त असल्याने तांबडा रंग प्राप्त झाला आहे.
- जांभी मृदा
- पर्वतीय मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात.
- वालुकामय मृदा – राजस्थानमधील इंदिरा गांधी कालव्यामुळे मृदेची उत्पादकता वाढली आहे.
- क्षारयुक्त व अल्कली मृदा
• जगातील उत्तम प्रजातीच्या मॅंग्रुव्ह वनस्पतीचे मूळ भारतात आहे.
• स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना 1951 साली झाली.
• जागातील लोकसंख्येपैकी 17% लाकसंख्या भारतात आहे.
• सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेशची तर सर्वात कमी सिक्किमची आहे.
• लोकसंख्येची सर्वात जास्त घनता पश्चिम बंगालची तर कमी घनता अरूणाचल प्रदेशची आहे.
• भारतातील सुमारे 72% लोक ग्रामीण भागात राहतात.
• सतलज नदीवर हिमाचल प्रदेशमध्ये भाक्रा येथे 226 मी उंचीचे धरण हे जगातील सर्वात उंच धरणापैकी एक आहे. याच्या जलाशयास गोविंद सागर म्हणतात.
• भाक्रा प्रकल्पाच्या दक्षिणेस पंजाब राज्यात नांगल येथे दुसरे धरण बांधण्यात आले आहे. • हिराकूड प्रकल्प उडीसा राज्यात महानदीवर आहे.
• जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात पैठणजवळ गोदावरी नदीवर आहे. याच्या जलाशयास नाथसागर म्हणतात. याचा फायदा नगर, औरंगाबाद, बीड. जालना, परभणी या जिल्ह्यांना होतो. या धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यान, मत्स्यपालन केंद्र, पक्षी अभयारण्य व पर्यटन केंद्र आहे.
• लाखेचा उपयोग रंग व बांगड्या बमवण्यासाठी करतात.
• खैराच्या झाडापासून कात तयार करतात.
• पंजाब व हरियाणा राज्यात सर्वात जास्त लागवडीचे क्षेत्र आहे.
• भारतातील एकूण क्षेत्राच्या 23% क्षेत्र वनाखाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: