माझे वडील

माझे वडील          वडिलांना लहान मुलांच्या विश्वात खुप मोठे स्थान असते. वडिलच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतात. वडील स्वतः ला अधिकाधिक कठोर दर्शवितात पण त्यांच्या सारखं प्रेमळ आणि दयाळू कोणी नाही. आपल्या वर येणारी अनेक संकटे ते दूर करत असतात.

         माझ्या वडिलांचे नाव प्रकाश असून ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यावर संपूर्ण सोसायटीची जबाबदारी असल्या मुळे ते घरी येण्यास उशीर करतात. ते शांत प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत आणि ते नेहमी आनंदी असतात. जेव्हा ते घरी येतात आमच्या घरचे वातावरण हसरे आणि आनंदी होते. त्यांना मी बाबा म्हणूनच हाक मारतो.

        बाबा सकाळी लवकरच कामाला जातात आणि संध्याकाळी घरी येतात. घरी येताना सोबत माझ्या साठी नेहमी वृत्तपत्र आणतात मग मी थोड फार वाचून, कोड सोडवत बसतो. घरी आल्यावर हात पाय धुवून आजी ची विचारपूस करतात. नंतर मी त्यांना कोड्यांबद्दल विचारत बसतो तेव्हा आई मला ओरडते. ती म्हणते की , बाबांना जरा श्वास तर घेऊ दे . मग चहा नाष्टा झाला की बाबा आणि आम्ही कोड सोडवत बसतो. नंतर मला माझ्या शालेय घर पाठ साठी ही मदत करतात.

      आमच्या बाबांकडे सोसायटीच्या महत्वाच्या चाव्या असतात. त्यामुळे ते कधी न कळवता रजा घेत नाहीत. जेव्हा मात्र आम्हाला खरोखरच गरज असते तेव्हा बाबा रजा घेतात. मध्यंतरी आजी आजारी पडली तेव्हा बाबांनी दहा दिवस तिची सेवाशुसृषा केली होती. आई कधी आजारी पडली की तिलाही रजा घेऊन चिकत्सलयात घेऊन जातात. प्रत्येक मे महिन्यात बाबा आम्हाला  पाच दिवसांसाठी सहलीला नेतात.       आमच्या बाबांना समाजकार्याची खुप आवड आहे. विभागातील अनेक सेवा संस्थेसाठी देणग्या गोळा करून पाठवतात. रक्तदान शिबीर मधे ते आवरजून भाग घेतात. खुप वेळा त्यांचा विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती कडून सन्मान झाला आहे. त्यावेळी मला खूप बरे वाटते आणि बाबांचा अभिमानही वाटतो.

       माझे वडील मला नेहमी माझ्या चुका आणि माझे चांगले काम याबद्दल मार्गदर्शन करतात. मला रोज व्यायाम केला पाहिजे, वेळेवर उठल पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. ते म्हणतात की मुलांना खेळाची आणि व्यायामाची सवय लावली की ती उगाच भरकटत नाहीत. त्यामुळे यंदा त्यांनी नवीन सायकल मला दिली. आता मला ती चांगली चालवता येते.

     असे आमचे बाबा मला खूप आवडतात.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.