माझी सहल


माझी सहल



      "सहामाही परीक्षा संपली की दिवाळीत आपण सहलीला जाणार आहोत," असं सरांनी सांगायचा अवकाश, सगळ्या वर्गाने टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

        सहलीच ठिकाण होतं कोल्हापूरजवळ असणारा 'कंट क्लस शिवाय महाराजांचा पैलस, रंकाळा तलाव, पन्हाळागड आणि कन्हेरी मठसुद्धा !

    सूचनावही वर्गा-वर्गामधून फिरली आणि वर्गशिक्षकांकडे नावे नोंदवून पैसे देण्यासाठी विद्यार्थी जमू लागले.
सहल पूर्ण दोन दिवस एक रात्र असल्याने आम्हा विद्याचि नियोजनही सुरू झाले.

      ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच आम्ही शाळेजवळ एकत्र जमलो. पवार मॅडमनी विद्यार्थी सगळे आले आहेत हे पाहून आम्हाला बसमध्ये बसण्याची सूचना दिली. बसपुढे नारळ फोडून, बसची पूजा करून आमच्या प्रवासास सुरुवात झाली. 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करीत, मुले विरुद्ध मुली गाण्याच्या भेड्या सुरू झाल्या. तासाभरात एका बोगद्यातून आमची बस प्रवास करू लागली. आतापर्यंत 'बोगदा' शब्द ऐकला होता, आता तो प्रत्यक्षात अनुभवला. आम्ही मुलांनी खूप आरडा-ओरड करून आनंद व्यक्त केला.

       मध्येच ९च्या सुमारास एके ठिकाणी गरमागरम इडली, बड़ा, चटणी असा भरपेट नाश्ता झाला . गाडीत बसून पाय अवघडले होते,  तेही मोकळे झाले .

पुन्हा प्रवासास सुरुवात. दुपारी १ च्या सुमारास आम्ही केंट क्लबवर पोहोचलो. सगळ्या मुलांनी आपापल्या वर्गानुसार शिस्तीत रांगा केल्या. इथे मात्र सगळेजण शांत, चिडिचूप होते. शहाण्या मुलांसारखे! 
आम्हाला सांगितलेल्या खोल्यांमध्ये आम्ही आमचे सामान ठेवून जेवणासाठी हॉलमध्ये जमलो. खूप भूक लागल्यामुळे गरम जेवणावर अक्षरशः तुटून पडलो.

     लगेचच केंट क्लबमध्येच असणाऱ्या स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, हॉरर शो, विडियो गेम्स, पाळणाचक्र, बैलगाडीतून फेरी इ. साठी आमचे गट करून सरांनी आम्हाला पाठवले. स्नो वर्ल्डमध्ये बर्फात खेळताना लेदर शूज, जॅकेट, टोपी घातले होते तरीही आम्ही गारठलो, इतकी थंडी तेथे होती. प्रत्यक्ष बर्फात खेळण्याचा आनंद या सहलीमुळे आम्हाला मिळाला. एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे करून फेकले, घसरगुंडीवरून घसरलो, खूप खूप मज्जा केली.

      तिथून निघून वॉटर पार्कमध्ये आलो. तिथंही २-३ उंच-उंच घसरगुंड्या होत्या, ज्या थेट पाण्यात नेणाऱ्या! बाप रे, भीती वाटत होती. “नको बाबा जायला," " मी माझ्या मित्राला म्हटलं तर "काय घाबरतोस भित्र्या, चल, मी आहे
ना तुझ्याबरोबर" असं म्हणाला आणि घेऊनच गेला की! पाण्यात धप्पकन पडलो. नाका-तोंडात पाणी गेलं. जीवच घाबरला माझा; पण लाइफ जॅकेट घातलं होतं ना! कंटाळा येईपर्यंत पाण्यात डुंबलो. मग पाळणाचक्रात बसलो. गरगर फिरलो. खूप दंगा केला.

मग आम्ही हॉरर शोकडे आमचा मोर्चा वळवला. तिथं अंधारगुडूप होता. बारीक मिणमिणणारे दिवे, हाडांचा सापळा, मोडका पूल, मांजरीचा आवाज, भीतिदायक संगीत, एकूणच सगळं 'डेंजर' वाटलं. घाबरत-घाबरत एकमेकांचे हात धरून बाहेर आलो एकदाचे!

     शेवटी गावाबाहेरून बैलगाडीतून चक्कर! गंमत माहिती आहे का? त्या बैलगाडीला चाके लाकडाची नव्हती तर ते चक्क टायर होते. बैलाच्या गळ्यात पुंगराच्या माळा होत्या, अंगावर झूल होती. ती अनोखी सफर मला खूप आवडली. एवढं सगळं खेळल्यावर भूकही कडकडून लागली होती, हे सांगायला नकोच! पोटभर जेवून दुसऱ्या दिवशी लवकर उठण्यासाठी पटकन झोपी गेलो.

    पहाटे लवकरच जाग आली. सगळयांचीच गडबड चालू होती. वेलत आटीपूर्ण शाहू महाराजांचा राजवाडा, पन्हाळगड पहायचा होता ना 

   शाहू महाराजांच्या राजवाड्याचे काय वर्णन करवि? पॅलेसच तो महाराजांचीफोटो, शिकार केल्यानंतर भुसा भरुन ठेवलेले प्राणी, गालिलवे, चादीन मख्याल । टेबल, खुर्व्या, आरसे, दरबार हॉल सगळंच स्तम्भित करणार.

     पन्हाळगड पाहताना शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना येत होती. धान्य गोदामे, विहिरी, गुप्त मार्ग, तबक उद्यान, हिरवीगार झाडि, बाजीप्रभुचा भव्य पुतळा सारं थक्क करणारं!

     त्यानंतर कान्हेरी मठात पोहोचलो. पूर्वी होऊन गेलेल्या अनेक रुशि -मुनींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारे फलकही लावले आहेत. अगदी शकुंतलेचा (कण्वमुनींचा! ) आश्रम, मरत राजा सिंहाया जाडा उघडून दात मोजतोय, शल्यविशारद कणाद इ. आणि शेतात पेरणी करणारे, उफणणी करणारे, शेत नांगरणारे शेतकरी, पाणी भरायला विहिरीवर गेलेल्या स्त्रिया, नदीत डुंबणाऱ्या म्हशीसुद्धा! या प्रतिकृती फायबरपासून आहेत. पुढे बारा बलुतेदारांचं गावच वसवलंय. आपापली कामे करण्यात गुना गेलेले सुतार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार यांना पाहून त्यांना काही विचारण्यायी मोह होतो, एवढे खरे वाटतात. हो, सगळं पाहताना आम्ही अगदी हरखून गालो होता.

जवळजवळ ३ तासांच्या या सफरीनंतर आम्ही सर्व विद्यार्थी परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये चढलो.

आता परतताना मात्र गाण्याच्या मेंड्या नव्हत्या तर सहलीस काय पाहिले ?कशी मजा केली? कसा आनंद मिळाला? यावरच गप्पांचा कार्यक्रण रंगला होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.