महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- ९ कोटी, ६८ लाख, ७९ हजार. लोकसंख्येची घनता- ३१४ व्यक्ती दर चौ. कि.मी. स्त्री-पुरुष प्रमाण- ९२२ (दरहजारी). पुरुष साक्षरता- ८३.३ टक्के, स्त्री साक्षरता- ६७.५ टक्के (२००५- ७१.६० टक्के).
महाराष्ट्रातील :
१) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर, लहान जिल्हा- मुंबई शहर
२) सर्वात जास्त पावसाचे ठिकाण – अंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर
३) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.
४) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.
५) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.
६) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.
७) सर्वाधिक लोकसंख्येची घनता – बृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.
८) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.
९) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.
२) सर्वात जास्त पावसाचे ठिकाण – अंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर
३) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.
४) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.
५) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.
६) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.
७) सर्वाधिक लोकसंख्येची घनता – बृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.
८) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.
९) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.
महाराष्ट्रातील सर्वात पहिले :
१) पहिले साप्ताहिक- दर्पण (१८३२)
२) पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०)
३) पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश
४) पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८)
५) पहिली सैनिकी शाळा- सातारा
६) पहिला साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग
) पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
८) पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग
९) पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर- चंद्रपूर
१०) पहिले ऊर्जा उद्यान- पुणे
११) उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका- इचलकरंजी (कोल्हापूर)
२) पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०)
३) पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश
४) पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८)
५) पहिली सैनिकी शाळा- सातारा
६) पहिला साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग
) पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
८) पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग
९) पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर- चंद्रपूर
१०) पहिले ऊर्जा उद्यान- पुणे
११) उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका- इचलकरंजी (कोल्हापूर)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ.सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली. कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे. उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो. कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे. सह्य़ाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे. सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे. महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे. कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात. शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली. सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.
महाराष्ट्राचे हवामान
• कोकणातील हवामान उष्ण, सम व दमट आहे.
• सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर व आंबोली ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तर, सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
• पठारी प्रदेश—पठारावरील हवामान उष्ण, विषम आणि कोरडेआहे.
• जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात.हे वारे अरबी समुद्रावरून वाहतात.
• आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे.
• कोकण व सह्याद्री भागात सुमारे 3000 मि.मी, पर्जन्य होतो.
• विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात.
• महाराष्ट्राचे लोकजीवन— तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणातील लोक प्रामुख्याने मराठी व मालवणी भाषा बोलतात. कोकणातील लोक होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करतात.
• शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. पठारावरील हवामान उष्ण, कोरडे व विषम असते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते.
• आदिवासी वस्त्यांना विविध भागात पाडा, पौड, टोला, झाप अशी नावे आहेत.
• प्रमुख आदिवासी जमाती प्रदेश
- गौड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
- भिल्ल धुळे, नंदूरबार, जळगाव
- कोकणा नाशिक, धुळे
- कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट
- वारली ठाणे(जव्हार, डहाणू, मोखाडा)
- ठाकर, महादेव कोळी पुणे, अहमदनगर,नाशिक,ठाणे
- कोलाम राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश
महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख इतर वैशिष्टय़े व जिल्हानिहाय टोपण नावे :-
- भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
- भारताची आर्थिक राजधानी – मुंबई.
- महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
- महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
- महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
- मुंबईची परसबाग – नाशिक
- महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
- मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
- द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
- आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
- महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
- महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
- संत्र्याचा जिल्हा- नागपूर
- महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
- जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
- महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
- साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
- महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
- महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
- कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
- लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद
- महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड
- महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद
- महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड
- देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा- अमरावती.
जलसंपत्ती व सागर संपत्ती
- विहीर महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन आहे.
- पोफळी (कोयना), जायकवाडी. भिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली, भिवपुरी ही महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे आहेत.
- राज्यात वसई,भाईंदर, डहाणू आदी ठिकाणी मिठागरे आहेत.
- महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रेसर आहे.
- जमिनीखाली साठलेल्या पाण्यास भूजल म्हणतात.
- वनसंपत्ती—नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे.
- सदाहरीत वने—ही वने वर्षभर सदाहरीत असतात. सह्याद्रीच्या दक्षिण भागात आढळतात.
- निमसदाहरीत वनस्पती—ही वने सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात आढळतात. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे.
- महाराष्ट्र राज्याचा वनक्षेत्र पानझडी वने प्रकारच्या वनाने व्यापला आहे.
- झुडपी व काटेरी वने—ही वने पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही वने हमखास सापडतात.
- खारफुटी वने—पश्चिम किनारापट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात.
- पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल(हिरवे कबूतर) हा आपला राज्यपक्षी आहे. तर, भिमाशंकर येथे आढळणारी शेखरू ही मोठी खार आपला राज्यप्राणी आहे.
- महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो.
खनिजे जिल्हे
- मॅंगनीज - नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदूर्ग
- लोहखनिज - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग
- बॉक्साईट - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
- चुनखडक - गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर
- क्रोमाईट - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
- डोलोमाईट - यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),
- सिलिका - सिंधुदूर्ग
- तांबे - चंद्रपूर
- अभ्रक - नागपूर, चंद्रपूर
- मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेलक्षेत्रे आहेत.
- उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो.
- दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत. तर, सूर्यकिरण, वारा, टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. महाराष्ट्रात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जामसांडे व विजयदूर्ग सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी ही प्रमुख केंद्रे आहेत.
- औष्णिक विद्युत केंद्रे- कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू
- जलविद्युत केंद्र- पोफळी, भिरा, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी.
- अणुविद्युत- तारापूर
- ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात केले जाते.
- औरंगाबाद विभागात कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
- व्यापारी दृष्टीकोनातून जी पिके घेतली जातात, त्यास व्यापारी पिके म्हणतात.
- द्राक्षाचे उत्पादन नाशिक व सांगली येथे, जळगाव व वसईची केळी प्रसिद्ध आहेत. नागपूर जिल्हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हापूस व पायरी हे आंबे आहेत. घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा व सांगली जिल्हा हळद व आले उत्पादनासाठी प्रसिद्ध आह* यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव व इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे आहेत.
• देशातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या मार्गावर 1925 मध्ये धावली.
• कोकण रेल्वेने 2003 मध्ये स्कायबसची पहिली चाचणी घेतली.कोकण रेल्वेचा शुभारंभ 1998 साली करण्यात आला.
• आशियातील सर्वात लांबीचा बोगदा करबुडे हा होय
• लॉर्ड डलहौसीने 1853 मध्ये रेल्वे सुरू केली.
• कोकण रेल्वेने 2003 मध्ये स्कायबसची पहिली चाचणी घेतली.कोकण रेल्वेचा शुभारंभ 1998 साली करण्यात आला.
• आशियातील सर्वात लांबीचा बोगदा करबुडे हा होय
• लॉर्ड डलहौसीने 1853 मध्ये रेल्वे सुरू केली.
• प्रशासकीय विभाग—
1) पुणे—सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
2) नागपूर—वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
3) कोकण—मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे-रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.
4)औरंगाबाद—बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5) अमरावती—बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
6) नाशिक—नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव.
1) पुणे—सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
2) नागपूर—वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
3) कोकण—मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे-रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.
4)औरंगाबाद—बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5) अमरावती—बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
6) नाशिक—नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव.
• महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये— महाराष्ट्राच्या ईशान्येला छत्तीसगड, आग्नेयला आंध्रप्रदेश, दक्षिणेला कर्नाटक-गोवा, पश्चिमेला दमण दीव व दादरा नगर हवेली हे केंद्र शासित प्रदेश, वायव्येला गुजरात तर, उत्तरेला उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश आहे.
• प्रादेशिक विभाग- 1) पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर 2) मराठवाडा—औरंगाबाद विभाग 3) विदर्भ – अमरावती व नागपूर विभाग 4) खानदेश- धुळे, नंदूरबार, जळगाव 5) कोकण- मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: