माझी आई

माझी आई

Maazi Aai


"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी "
        हे वचन खूप प्रसिद्ध आहे. कारणच तस आहे, जरा लागलं, पडलो की मुखातून आई आलचं पाहिजे. जेव्हा आपल्या आयुष्यात कधीही कठीण प्रसंग येतो तेव्हा आईच आपल्याला आठवते. लहान वयात तर आपण पूर्ण पणे आईवरच निर्भर असतो. म्हणूनच सगळ्यांना आपली आईच प्रिय असते.

        माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे असे मला वाटते. माझ्या आईच नाव प्रतिभा आहे. तिच्या बद्दल बोलायच झालं तर शब्द   अपुरे पडतील. जेव्हा मी लहान होतो माझ्या कडून खूप साऱ्या चुका व्हायच्या बाबा तर माझ्या वर खूप ओरडायचे , तेव्हा आई लगेच येऊन मला प्रेमाने समजवायची,की बाळा असं करू नये,मग मला माझी चूक लक्षात यायची. शाळेत जाताना ती माझ्या सोबत यायची आणि नेहमी सांगत असे की, बाळा शाळेत मस्ती करू नकोस. शाळेतून घरी गेल्यावर मला नेहमी चहा नाश्त्याला नव नवीन पदार्थ बनवून देत असे. तिने केलेले कांदेपोहे मला आजही खूप आवडतात.

      शाळेचा अभ्यास , प्रोजेक्ट मध्ये आईच मला खूप मदत करत असे. सहलीला जाण्यासाठी आईच माझ्यासाठी बाबांकडून फी चे पैसे घेत असे. कधी आजारी पडलो की, आईला चैनच पडत नसे, माझी खूप काळजी घेत असे. कधी कधी मला मुद्दाम वाटायचं की ताप आल्याचं नाटक करून घरीच रहावं ,मग आई माझा खूप लाड पुरवेल. मी तिला तिच्या कामात ही मदत करतो, भाजी किंवा वाण्या कडून वस्तू आणून देतो त्यामुळे ती पण खुश व्हायची. तिला बरे वाटले की मलाही खूप बरे वाटायचे.



    आई हे ममतेची महासागर आहे, आपल्याला तीच्या कडून खूप संस्कार आणि प्रेम मिळत असतं. कधी कधी ती मला खूप वेळा काहीतरी करायला सांगत असे,पण मला पटत नसे. मग मी ते काम करत नसे. पण मला नंतर कळायचं आई सांगत होती ते एकदम बरोबर होत. मग मी तिचे सर्व गोष्टी ऐकायचो. तीच माझ सर्वस्व आहे. तीच माझ्यावर आणि माझं ही तिच्यावर खुप प्रेम आहे.

अशी आहे माझी आई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.