भाऊबीज सण


भाऊबीज सण



प्रस्तावना - दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि `कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जातेभाऊबीज ला यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊबीजचा सण भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या खोल प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा उत्सव आहे.



कसा साजरा करावा भाऊबीजेचा सण दिपावलीच्या शेवटल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी विवाहित बहिणी, भावंडं आपल्या भावाला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात . भावाला टिळक लावून आणि भेट देऊन बहिण त्याच्या दीर्घायुषी जीवणाची कामना करतेभाऊबीज वर संबंधित काही श्रद्धा आहेत, त्या आधारावर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जातात.


भाऊबीजची कथा - यमराज आणि यमुनाचा जन्म सूर्यदेव यांच्या पत्नी छायाच्या गर्भाशयातून झाला. यमुना आपला भाऊ यमराज यांना प्रेमळपणे विनंती करतात की ते तिच्या घरी येऊन जेवाव. पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनाची विनंती पुढे ढकलत असत. कार्तिक शुक्ल द्वितीयाला यमला अचानक त्याच्या दाराजवळ पाहून यमुना ला आनंद झाला. तेव्हा तिने त्याच्या कपाळी कुंकुमतिलक लावून त्याला ओवाळले आणि भोजन दिले  यावर खूष होऊन यमराजांनी बहिणीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमी (यमुना) हिने प्रत्येक वर्षी या दिवशी येण्याचे यमकडून वचन घेतले. त्यामुळे हिंदू लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की ह्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून ओवाळून घेईल त्याला कधीही नरकात जावे लागणार नाही.



    ह्या दिवसाबद्दल पुराणातील दुसरी कथा अशी आहे की श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यावर तो आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेला. तेव्हा तिने त्याला ओवाळले. त्या प्रसंगाची आठवण म्हणूनही भाऊबीज साजरी करतात. 



ज्या स्त्रियांना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात.



   मला तर भाऊबीज हा सण खूप आवडतो कारण ह्या दिवशी ओवाळणीमध्ये खूपखूप भेटी मिळतात. ह्या दिवशी आम्ही सर्व नातेवाईक एकत्र भेटतो. माझी मावशी आणि मामा आमच्या घरी येतात. मला दोन मावसभाऊ आणि दोन मामेभाऊ आहेत. त्यांना सख्खी बहीण नाही त्यामुळे माझे खूप लाड होतात भाऊबीजेच्या आदल्या दिवशी आई दिवसभर दूध आटवून चांगली दाट बासंटी करते. त्यामुळे आम्हाला भाऊबीजेच्या दिवशी बासुंदीपुरीचे सुग्रास जेवण मिळते.भाऊबीजेच्या दिवशी मी नवा परकरपोलका घालून चांदीच्या निरांजनाने माझ्या भावांना ओवाळते. ते मला बाहुली, पुस्तके फ्रॉक अशा छानछान वस्तू देतात. मीसुद्धा त्यांना बॅट, बॉल, व्यापारडाव अशा भेटवस्तू देते. मग संध्याकाळी आम्ही गच्चीवर जातो तेव्हा आकाशातली फटाक्यांची आतषबाजी पाहून मन अगदी हरखून जाते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.