कोजागिरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा


 कोजागिरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा


     आश्विन महिन्यात येणारी कोजागिरी पौर्णिमा हा हिंदूंचा एक प्रसिद्ध सण आहे. शारदीय नवरात्रोत्सव नंतर येणाऱ्या पौर्णिमेला ' कोजागिरी पौर्णिमा ' म्हणतात.


दुधाच सेवन :- 

      अशी मान्यता आहे की आश्विन शुक्ल पक्षातील या पौर्णिमेला चंद्रा तून अमृत वर्षा होते.या दिवशी चंद्र ९९.९९% शुभ्र प्रकाशित असतो. अस सांगतात की या रात्री खीर बनवून खुल्या आकाशाखाली ठेऊन नंतर प्राशन केल्यावर हितकारी प्रभाव पडतो.

लक्ष्मी पूजन :- 

     अशी मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मी चा जन्म झाला होता. त्यामुळे देशात काही भागात देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते.या दिवशी अर्ध्या रात्रीपर्यंत जागरण केले जाते.पुराणात व प्राचीन ग्रंथात असे सांगितले जाते की मध्य रात्री नंतर साक्षात लक्ष्मीदेवी येऊन ' को जागर्ती ' विचारते. म्हणजेच कोण जाग आहे असे विचारून जागे असलेल्या लोकांना धन लाभ मिळतो.म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।

या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.


ऐतिहसिक महत्त्व :-

    चंद्र या पौर्णिमेच्या दिवशी  पृथ्वीच्या इतर दिवसांपेक्षा खूप जवळ असतो. या दिवशीचे महत्व आयुर्वेदात देखील नमूद केले आहेत. या दिवशी आयुर्वेदिक औषधे अतिशय इलाजकारी असतात अशी मान्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.