बस थांबा सुरू करण्याबाबत विनंती पत्र Bus Thamba Suru Karanya babat


बस थांबा सुरू करण्याबाबत विनंती पत्र


बस थांबा सुरू करण्याबाबत विनंती पत्र


दिनांक :-        /         /             .

प्रति,
माननीय प्रबंधक महोदय,
बी ई एस टी
मुंबई


                                विषय :- बस थांबा सुरू करण्याबाबत विनंती पत्र

महोदय,

        मी कलानगर, मुंबई मध्ये राहणारा एक रहिवाशी आहे. आमच्या कलानगर परिसरात जवळपास रेल्वे वाहतूक सुविधा नसल्याने, सर्व रहिवाशी प्रवासासाठी बेस्ट बस आणि खाजगी वाहनांचा वापर करतात. खाजगी वाहनांचा खर्च रहिवाश्यांना रोजच्या प्रवासात परवडण्या सारखं नाही. तरी बेस्ट बस चा वापर करावा हा विचार सर्व रहिवाशी करतात. पण अस आमच्या परिसरात जवळ पास बेस्ट बस थांबा नसल्याने बस सेवे साठी २० ते २५ मिनिट पायी जाव लागते. परिसरातील अनेक मार्गावरून बस सेवा सुरू आहेत.पण जवळच बस थांबा नसल्याने रहिवाश्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

        तरी महोदय आपणास विनंती आहे की, आमच्या सोसायटी जवळच असलेल्या मार्गावर नवीन बस थांबा सुरू करण्यात यावा. वाहतूक मार्ग रुंद असल्यामुळे रहदारी चा प्रश्नही निर्माण होणार नाही आणि रहिवाश्यांना ही खूप आनंद होईल आणि त्यांचे रोजचे प्रवासाचे प्रश्न सुटतील. कळावे.

धन्यवाद !

आपला नम्र,
राकेश कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.