पाणी- आजचे अमूल्य धन


पाणी- आजचे अमूल्य धन


      आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते.मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे पाणी होते हेच आहे, म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ' जीवन ' असा आहे.

       आपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे, शनी, गुरु,मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आवश्यक आसे .तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्रे मिळते, वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी,सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूप आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत आहेत.     समुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल साठे असूनही ते खारटअसल्याने आपण त्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णते ने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर आकाशात तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक वर्षानुवर्षे चालूच असते.

        स्वच्छता राखण्यासाठी. आंघोळीसाठी, शेतीसाठी ,कारखाने चाल वण्यासाठी अणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय वाहतुकीसाठीही नद्या आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र नाहीशी होत चालली आहे. पाण्याचे प्रदूषणही वाढत चालले आहे. गंगा यमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.

       केंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीपोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अमलबजावणी चांगली झाली नाही. राजस्थान, गुजरात,ओरिसा भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधी कधी पडतच नाही.त्यामुळे दुष्काळ पडतो. शेती पिकत नाही जनावरे मरतात. माणसे पाण्यासाठी तडफडतात. शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.
म्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी ह्योची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्पाची पातळी
वाढेल.

      माणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.