आपल्या मित्रास कोविड -19 या महामारीत आपल्या परिसरातील गरजू लोकांना अन्नदान केल्याबद्दल अभिनंदन

 

आपल्या मित्रास कोविड -19 या महामारीत आपल्या परिसरातील गरजू लोकांना अन्नदान केल्याबद्दल अभिनंदन



अ. ब. क

१९, शनिवार पेठ,

पुणे


 प्रिय मित्र रमेश,

       स न वि वि

                 अभिनंदन ! आज सकाळी वृत्तपत्रात तुझा फोटो आणि ' एक कोविड हिरो ' अस संबोधित तुझी संपूर्ण बातमी वाचली, खूप आनंद झाला. मला तर तुझा खूप अभिमान वाटतो. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांचे काम काज बंद झाले होते यामुळे कित्येक कुटुंबांकडे खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. अशा महामारीच्या काळात गरजू लोकांना अन्नदान करण्यासाठी तू आणि तुझे  संवगडी एकत्र येऊन जे सत्कार्य केलेस हे अगदी प्रशंसनीय आहे. 

    तू एक कुक आहेस. तुला ही लॉकडाऊन च्यामुळे कोणताही काम नव्हतं. तरीही तू आणि तुझे मित्र मिळून गरजू लोकांना मदत करायचं ठरवलं. दररोज तुम्ही मिळून ३०० लोकांना जेवणाची सोय करून देता. त्यांना कोरोणा महामारी विषयी जागरूक करता. हे खूपच चांगला काम आहे.  शाळेतील सर्व मित्र तुझा हेवा करत आहेत.आणि तुझ्या या कौतुकास्पद कार्याचे मूल्यमापन तर करता येणार नाही. पण नक्कीच तू एक हिरो म्हणून भरारी मारली आहेस.

         असो तुला अजून काही मदत लागली तर आम्ही ही तुझ्या या कार्याला हातभार लावण्यासाठी तत्पर आहोत. यापुढेही तू असच मदत करत राहावे, यासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा!



तुझाच मित्र 

राकेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.