तुमच्या छोट्या भावाला ' आदर्श विद्यार्थी ' चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र.

तुमच्या छोट्या भावाला ' आदर्श विद्यार्थी ' चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र.

aadarsh Vidyarthi


|| श्री ||


मनाली गावणुक

सातारा,

१० . १० .२०२०


चि. योगेश यास,

शुभाशीर्वाद


         अभिनंदन ! कालच बाबाने फोनवरून तुझा ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून शाळेमध्ये सत्कार झाल्याचे सांगितले. ऐकून खूप आनंद झाला. शाब्बास! योगेश .

         इयत्ता ८ वी आणि आता इयत्ता ९ वी या दोन्ही वर्षी सलग तुला हा पुरस्कार मिळतो आहे. तरी इयत्ता १० वी मध्ये सुद्धा हा पुरस्कार मिळवून हॅट्ट्रिक करशील, असा माझ ठाम विश्वास आहे.

       शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थी कडून तुझी खूप वाह वाह होत आहे. शिक्षक तर मला फोन करून तुझी प्रसंसा करतात. आंतरशालेय निबंध स्पर्धा, नाटक स्पर्धा तुझ्या शिवाय अपुरी आहे. समूहगीत, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा सगळ्याच बाबतीत तू नेहमी अग्रेसर असतोस. आई ने सांगितलं एकही दिवस गैरहजर नसल्याने तुझ्या मुख्याध्याकांकडून कौतुक झालं आहे.

     असो ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून जसा तुझा गौरव झाला त्याचप्रमाणे समाजातही आदर्श नागरिक म्हणून तुझा सन्मान व्हावा , अशी इच्छा आहे.

     पुन्हा एकदा तुझे अभिनंदन ! आई बाबांना माझा नमस्कार सांग. सुट्टी घेऊन नक्की तुला भेटायला येऊन .तुझी ताई

मनालीतुमच्या छोट्या भावाला ' आदर्श विद्यार्थी ' चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र. तुमच्या छोट्या भावाला ' आदर्श विद्यार्थी ' चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र. Reviewed by Marathijag on ऑक्टोबर २९, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.