बसस्थानकावरील दृश्य

बसस्थानकावरील दृश्य


        मी रोज सकाळी सार्वजनिक परिवहनाच्या बसने शाळेत जातो. माझ्या घरापासून शाळा दहा किलोमीटर अंतरावर आहे .त्यामुळे बसशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्या बसस्थानकावरून मी जातो ते बसस्थानक पूर्वी फारच बेशिस्त होते. बस साठी रांगा वगैरे लावण्याची पद्धतच नव्हती.एकाच स्थानकावर पाच सहा बस थांबत असल्यामुळे कुठल्या बससाठी कुठे रांग लावायची ते कळत नसल्यामुळे तसे होत असावे. पण त्यामुळे बस आली की त्यात चढण्यासाठी एकच झुंबड उडत असे. त्या गर्दीत आणि खेचाखेचीत आम्हा शाळेत जाणा-या पाच- सहावीतल्या मुलांची मात्र फारच वाट लागत असे. दप्तर, डबा घेऊन बसमध्ये चढणे आणि आपले ठिकाण आल्यावर उतरणे म्हणजे युद्ध खेळून आल्यासारखे होत असे त्यामुळेच त्या बसस्थानकावर पाकिटमार लोकांचे चांगलेच फावले. कित्येक भल्य लोकांची पाकिटे मारली जाऊन त्यांना फारच नुकसानीला सामोरे जावे लागले. भिकारी चणेदाणेवाले, फेरीवाले ह्यांनीही बसस्थानकाचा परिसर व्यापून टाकला होता. कागदाचे कपटे आणि घाण जागोजाग पसरलेली होती.

      तेव्हा मग आम्ही शाळेतील मुलांनीच पुढाकार घेऊन परिवहन अधिका-यांचं भेट घेतली आणि त्यांना आमच्या बसस्थानकाची दुर्दशा सांगितली. आमचे बोलणे त्यांनी सहानुभूतीने ऐकून घेतले आणि त्यांना ते पटलेही. त्यानुसार त्यांनी कार्यवाही केली आणि आज आमचे बसस्थानक अगदी आदर्श म्हणावे तसे झाले आहे. आज तेथील दृश्य कसे असते?

      मुळात त्यांनी एका बसस्थानकाची दोन बसस्थानके केली, म्हणजे एकादिशेने जाणा या बसचे स्थानक वेगळे केले आणि दुस-या दिशेने जाणा-या बसचे स्थानक वेगळे केले. त्यामुळे लोक व्यवस्थित रांगा लावून उभे राहू लागले, वृद्धांप्रमाणेच शाळेतल्या मुलांनाही पुढल्या बाजूने चढण्याउतरण्यास परवानगी दिली भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले हानी बसस्थानकातील जागा बळकावली होती तिथून त्यांना हिसकावून लावण्यात आले, कचरा टाकण्यासाठी वेगळी कचराकुंडी ठेवली. स्थानकाची साफसफाईसुद्धा रोजच्या रोज होऊ लागली. त्यामुळे प्रवासी लोकांची खूपच सोय झाली.

     माझ्या शाळेत जातायेतानाच्या बसप्रवासाचे माझ्या आईला खूपच दडपण येत असे ते तिच्या मनावरचे दडपण खूपच कमी झाले.

तर असे असते आमच्या बसस्थानकातील दृश्य उद्याच्या भारतात हेच दृश्य जागोजाग दिसले पाहिजे.



bas sthanka varil drushya


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.