मला पंख असते तर । Mala Pankh aste tar

मला पंख असते तर..

(1)

'मन वढाय, वढाय

आता होतं भुईवर

आता गेलं आभायात'


       बहिणाबाई चौधरी आपल्या या काव्यातून मनाच्या चंचलतेविषयी म्हणतात की, क्षणात जमिनीवर असणारं मन आकाशात कधी झेप घेतं ते कळतही नाही.

        काल प्रार्थनेसाठी मैदानात उभे असताना आकाशातून जाणारे विमान पाहिले अन् मनात एक विचार आला की, 'मला पंख असते तर...'

      अय्या! काय छान कल्पना सुचली नाही?

        मला पंख असते तर आई मला घरात डांबून ठेवूच शकली नसती. आईच्या हातावर तुरी देऊन मी सगळ्या मैत्रिणींना पटकन भेटून आले असते. रोज सकाळी जाग आल्यावर पक्ष्यांप्रमाणेच मी या झाडावरून त्या झाडावर भटकत राहिले असते. कैरी, जांभळे, पेरू, चिकू अशा वेगवेगळ्या फळांचा फडशा पाडला असता. आणि मी कैरी, चिंच खाल्ल्याचं आईला कळलंचं नसतं, त्यामुळे तिचा ओरडाही खावा लागला नसता! शिवाय फिरून फिरून दमल्यावर झाडाच्या गर्द फांदीवर बसून झोके घेत, घेत एक छानशी डुलकीपण घेतली असती.

      शाळेमध्ये गृहपाठ केला नाही म्हणून मॅडम छडी घेऊन आल्या, तर पटकन पंख पसरून खिडकीतून भुरकन उडून गेले असते.

       मला पंख असते तर विनातिकीट पी कुलेली जाऊ शकले असते. अगदी गावाच्या बाहेर, देशाच्याही बाहेर बरं का ! ते कुठलर पक्षी नाही का येत सातासमुद्रापलीकडून आपल्या देशात, तसे ! ना पासपोर्टच झंझट ना व्हिसाच.

Click To Buy


        पण देशाच्या बाहेर जाण्याजाची मी आपल्याच गावातील राज्यांतील देशातील सगळी प्रेक्षणीय स्थळे डोळे भरून पाहिली असती, आपल्या गावातून वाहणा-या नदीवराज पंख पसरून मी मनसोबत विहार केला असता.  खूप दिवसांपासून उंच झाडाला टांगलेले सुगरणीचे घाटै जवळून पहायची इच्छा होती, ती पूर्ण करून घेतली असती. 

         आमच्या शाळा, बाबांचे काम यामुळे आईला तिच्या आईकडे म्हणजे माझ्या आजीकडे जाता येत नाही, कधी कधी ती उदास असते, तेव्हा पटकन तिला घेऊन गेले असते तिच्या आईचा भेटीला। तिला अचानक असं पाहून माझी आजी किती खूश झाली असती ना!

      पण मनात एक विचार आला की, सगळ्या मानवांना थोडेच पंख असतात? मग मला पंख आहेत हे पाहून कुणी दुष्टानं मला जाळ्यात पकडलं आणि एखाद्या जत्रेत एक वेगळा प्राणी म्हणून पिंज यात बंदिस्त करून लोकांसमोर नेलं तर ?

      काही जण काय गंमतशीर प्राणी आहे म्हणून मला हसतील, तर लहान मुले मला दगड मारून मारून हैराण करतील, मग मला रडू येईल, पण त्यावेळी मायेनं जवळ घेणारी माझी आई थोडीच माझ्याजव्ळ असेल? 

      नको रे बाबा मला ते पंख , माझ्या आई - बाबांच्या पंखाखाली मी एकदम मजेत आहे, तेच बर!



 (2)


                   सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेलो “मला काय पंख आहेत का? कधीही उठाव आणि उडत उडत कुठेही पोहोचावं!”
त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच मला पंख असते तर?
                 
          सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. क्धीहि, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.
                   
        रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे विश्वची माझे घर.
               
      पंखांमध्ये बळ समावुन, एक उंच भरारी घेता येईल. उंच.. अजुन उंच, त्या निळ्या आकाश्याच्या दिशेने, ढगांच्या मध्ये. धुंद होऊन त्या निळाईमध्ये तरंगत राहीन नाहीतर मावळत्या दिनकराच्या त्या तांबड्या गोळ्याने सोनेरी झालेल्या आसमंतामध्ये गिरक्या घेत राहीन.
              
      वेळे अभावी, अधीक अंतरामुळे जे अनेक जिवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अश्या सगळ्यांना भेटु शकेन. दिवसभर मोकळ्या आकाश्यात झेपावल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परतुन पंखांचेच उबदार पांघरुण करीन आणि त्यात निजुन जाईन.

        बघा.. नुसत्या विचारांनाच पंख फुटले तर कुठे कुठे जाऊन आलो, मग खरंच पंख फुटले तर!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.