उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव पत्राद्वारे सांगणे

उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव पत्राद्वारे सांगणे
Unhalyachya Suttitil Anubhav Patradvare Sangne

दिनांक   0१.०५.२०१८

शांती निवास
दापोली,


आदरणीय काका ,

    साष्टांग नमस्कार,

        मी येथे मज्जेत आणि आंनदी आहे. आशा आहे कि तुम्ही आणि काकी तसेच सोनू आणि बंटी खुशाल असाल.आता दोन दिवसा पूर्वीच मी माझी उन्हाळी सुट्टी संपवून मुंबई हुन गावी परत आलो आहे. उन्हाळ्यात मुंबईच तापमान खूपच जास्त असत,तरीही मुंबई मी कधी थांबलेली बघितली नाही. सगळीकडे धावपळीत असणारे लोक मुंबई नेहमी गतिशील ठेवतात.
     मुंबई हि आर्थिक राजधानी आहे. येथे मी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, मरिन्स लाईन्स, राणीचा बाग, नेहरू तारांगण, मेट्रो सेवा, मोनो रेल, महालक्ष्मी आणि प्रभादेवी मंदिर, हे सर्व ऐतिहासिक स्थळे पहिली. राणी बागेत तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी पाहिले.येते माझा जुना मित्र राहुल सुद्धा भेटला.आम्ही दोघांनी खूप धमाल केली. मोठं मोठ्या इमारती सोडून येथील मंदिरे पण लक्षणीय आहेत. पण पूर्ण सुट्टीत बंटीची खूप आठवण आली. 

     मला परत कधी मुंबईला जायला भेटलं तर तुम्ही सोबत असावं असं मला वाटत. 

     पुन्हा एकदा तुम्हाला आणि काकीला सादर प्रणाम .

तुमचा  पुतण्या 
शिरीन 

उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव पत्राद्वारे सांगणे उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव पत्राद्वारे सांगणे Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १५, २०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.