हिवाळ्यातील एक दिवस


हिवाळ्यातील एक दिवस

winter


         हिवाळा हा ऋतू च खूप मला आवडतो.पण मी मुंबईला राहायला असल्या मुळे हिवाळा जास्त अनुभवयाला मिळत नाही. डिसेंबर , जानेवारी महिन्यात कुठे थंडी पडल्यासारखी वाटते.

           मला चांगलं आठवत गेल्या डिसेंबर ला आम्ही साताऱ्याला नातेवाईकांकडे गेलो होतो १ आठवडा. मुंबई हून दुपारी निघालो तेव्हा कुठे सायंकाळी पोहचलो. मी फार दमलो होतो म्हणून लगेच काही खाऊन झोपी गेलो. मध्येच मला जाग आली मध्यरात्री असेल बहुतेक माझे दात थंडीने कडकड वाजू लागले होते. बाजूलाच आई होती मग मी तिच्या कडची चादर अंगावर घेऊन झोपी गेलो. पण झोप कसली येतेय. सकाळी लवकर उठलो आणि गरम पाण्याने आंघोळ करून आईकडे स्वेटर मागितलं मग आईने बॅगेतून काढून दिला तो घातला. आंघोळ झाल्यानंतर मी घरा बाहेर पाहत होतो तर काय सगळीकडे अंधारल्या सारखं होत. सर्वत्र खूप धुक आणि गारठा होता. जरा सुर्य उगवला तेव्हा कुठे धुकं कमी झालं आणि हवा उबदार तशीच सुखदायी झाली.

           माझा मामेभाऊ तर अजून झोपला होता. नंतर तो उठून तयार झाल्यावर त्याने मला बाहेर फिरायला नेलं. मस्त थंड वारा वाहत होता. हात स्वेटर मध्ये टाकून त्याच्या सोबत फिरत होतो. काय ती हिरवळ बघून सर्व थंडी पळून गेली. धावत जाऊन मी तर लोळलो हिरव्या गवतात पण थोडा ओला झालो दव पडल्यामुळे ओले होत. पण आम्ही मस्ती करायची कमी नाही केली. मग त्याने पुढे अश्या ठिकाणी नेलं की  मन बघून प्रफुल्लित झालं , नजरे समोर नाना प्रकारांची फुले होती.नुसतं बघत राहावस वाटत होत. मामेभाऊ च्या मोबाईल मधे खूप सारी सेल्फी, फोटो काढून आम्ही नंतर घरी आलो.

           संध्याकाळी घरी आलो तर खूप सारी मंडळी भेटायला आली होती. मी पण सर्वांना भेटलो. आईने आणि मामी ने गरम गरम बटाटे वडे, आणि भजी तळले होते. मग आम्ही मस्त चहा आणि वडे खाल्ले. थोड्या वेळाने थंडी जाणवू लागली . मामा आणि मामे भाऊ यांना तर काहीच जाणवत नव्हते. मात्र मला स्वेटर शिवाय राहायला जमत नव्हत. रात्री लवकर जेऊन गप्प मी रूम मधे जाऊन खिडकी आणि दरवाजा बंद केली. गरम चादर घेऊन गप्प बेड वर पडलो तेव्हा अस वाटत होत स्वर्गात आलो. थंडी पाळली होती किंचित. आणि मना मध्ये विचार करत होतो. अशीच थंडी मुंबईला पडली तर काय होईल. शाळेत ही जायला होणार नाही सकाळी. दिवस भरातील थंडी, हिरव मैदान,फुलझाडे, मस्ती आणि गरम गरम भजी चा विचार करत करत कधी झोपी गेलो माहीतच नाही पडलं.

        किती वर्षांनी असा दिवस अनुभवला होता. म्हणून सर्व काही लक्षात आहे. आणि देवाला प्रार्थना करेन की देवा, तीच थोडी थंडी मुंबईला दिलीस तर किती छान होईल ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.