नक्षत्र स्वभाव निश्चित करतात…नक्षत्र स्वभाव निश्चित करतात…


नक्षत्राची एकूण संख्‍या २७ आहे. एक राशी अडीच नक्षत्राची असते. अशा प्रकारे १२ राशी तयार झाल्या आहेत. या नक्षत्रावर आपला स्वभाव निर्धारित होत असतो.

१)अश्विनी-
बौद्धिक प्रगल्भता, तेज स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षतत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात.

२)भरणी-
स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे.या नक्षत्राचा स्थायी भाव आहे.

३)कृतिका-
कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रामक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते.

४)रोहिणी-
रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेले लोक प्रसन्न, कलेत प्राविण्य मिळवणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुचि असणारे असतात.

५)मृगराशी-
बु्ध्दीवादी व भोगवादी यांचा समन्वय, उत्तम बुध्दीमत्ता तसेच यांचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे, हा नक्षत्राच्या लोकांचे विशेष म्हणावे लागेल.

६)आर्द्रा-
आर्द्रा नक्षत्र असणारे लोक खुप संतापी असतात. निर्णय घेताना ते नेहमी द्विधा मन:स्थितीत सापडतात. ते संशयीही असतात.

७)पुनर्वसु-
पुनर्वसु नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात. अध्यात्मात अधिक रुची घेत असतात.

८)अश्लेषा-
जिद्‍दी स्वभावामुळे कधीकधी असे लोक अविचारी होऊन बसतात. कोणावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु प्रत्येक कामात ‘आ बैल मुझे मार’ असे करत नेहमी वादळाला आमंत्रण देत असतात.

९)मघा-
स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्वाकांक्षी व सहज नेतृत्व असे गुण मघा नक्षत्र असणार्‍यांमध्ये असतात.

१०)पूर्वा-
पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळु, कलाप्रेमी, रसिक व छंदी असतात.

११)उत्तरा-
या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अत्यंत परिश्रमी असतात.

१२)हस्त-
कल्पनाशील, संवेदनशील, सुखी, समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

१३)चित्रा-
लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणार्‍यांमध्ये जाणवतात.

१४)स्वाती-
संयमी, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती तसेच दु:खा खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते.

१५)विशाखा-
स्वार्थी, जिद्‍दी तसेच आपलीच टिमक‍ी वाजविणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सिदा करण्यात ही मंडळी माहिर असते.

१६)अनुराधा-
कुटुंबवत्सल, श्रृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.

१७)ज्येष्ठा-
स्वभाव निर्मळ परंतु शत्रु ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात.

१८)मूल-
ज‍ीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रमताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणी धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात.

१९)पूर्वाषाढा-
शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्य प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात.

२०)उत्तराषाढा-
विनयशील, बुध्दीमान, अध्यात्मात रूची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

२१)श्रवण-
श्रद्धाळू, परोपकारी, कतृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.

२२)धनिष्ठा-
धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात.

२३)शततारका-
व्यसनाधीनता आणि कामवासनेकढे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात.

२४)पुष्य-
पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुध्दीमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो.

२५)पूर्व भाद्रपदा-
अधिक बुध्दीमान, संशोधक वृत्त‍ी तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

२६)उत्तरा भाद्रपदा-
मोहक चेहरा, संवादकौशल्याने निपून, चंचल व इतरांना चटकण मोहून घेणे, हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणार्‍या लोकांचा असतो.

२७)रेवती-
रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान असतात. ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात.


- Copy & Paste

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.