माझा आवडता खेळ - क्रिकेट



माझा आवडता खेळ - क्रिकेट


            जगात सर्वात प्रख्यात आणि भारतातील  लोकप्रिय असा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट असा एकमेव खेळ आहे, ज्याला लहान - मोठी मुले, वयस्कर आणि महिला, मुली सुद्धा पसंद करतात. क्रिकेट एक मैदानी खेळ आहे. हे तर आपल्याला माहीत आहे की, मनुष्याला सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज असते, शारीरिक व्यायामासाठी खेळा पेक्षा चांगलं अजून काही नाही होऊ शकत. क्रिकेट मधे शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धी देखील वापरावी लागते.

        क्रिकेट मॅच एक असा सामना आहे की तो एका व्यस्त माणसाला सुध्दा आपल्या कडे खेचतो. भारतात लगबग प्रत्येक गली- बोळात क्रिकेट खेळला जातो. खरं पाहता मला ही क्रिकेट जास्त आवडत नव्हते पण माझ्या मित्र आणि भावांसोबत खेळून खेळून मला पण क्रिकेट आवडायला लागला. पहिल्यांदा २००७ मधे मी क्रिकेट जागतिक सामने पाहिले, ते पाहून मला क्रिकेट चे बारकावे समजायला लागले आणि मी क्रिकेट च्यां खोल वर जाऊ लागलो आणि तो माझा सर्वात आवडता खेळ बनला. त्यानंतर आयपीएल ने तर अजूनच वेड लावले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे खेळ पाहून अजून मन तृप्त होत असे.

     महेंद्र सिंग धोनी, विराट, रोहित शर्मा, क्रिस गेल, डी विलिअरस अशा अनेक खेळाडूंचे खेळ पाहून मला सुद्धा मैदानात जाऊन खेळ पाहण्याचा हट्ट निर्माण झाला. माझ्या या इच्छेची पूर्तता माझ्या वडिलांनी आणि भावांनी केली . मी सुद्धा क्रिकेट कसोटी सामना स्टेडियम मधे जाऊन पाहिलं. स्टेडियम मधला वातावरण खूप उत्साही असते. चौकार षटकार लागल्यावर होणारा कल्लोळ , खेळाडू बाद झाल्यावर होणारी शांतता असे अनेक प्रसंग अनुभवयाला मिळाले. शेवटी भारताच्या कर्णधार महेंद्र सिंह कडे सामनावीर कप पाहून बरे वाटले आणि आम्ही घरी आलो.

      भारतात क्रिकेट मॅच च महत्व एका उत्सवापेक्षा कमी नाही. वर्ल्ड कप फायनल , किवा एक चांगला सामना बघण्यासाठी खूप जण आपल्या टीव्ही समोर बसून असतात.काही जण सुट्टी घेऊन सामना पाहतात. काही तर चालता चालता रेडिओ ऐकत असतात. मला ही कधी कधी वाटायचं आपण पण क्रिकेटर व्हावं पण ते काही जमेना. असं असलं तरी क्रिकेट माझा आवडता खेळ राहील. कारण आपल्या इथे अभ्यास वाढला की खेळ सर्व बंद होतात. त्यामुळे ती माझी करियर तर नाही होऊ शकत. तरीही माझ्या जीवनात मी जे काही करीन ते मी माझा आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनी सारखं जीव तोडून करेन एवढं मात्र नक्की.

११ टिप्पण्या:

  1. Hach nibanda mi lihin karan hach sundar Aahe ☺😊😊😊😊😊😊😊😊😊😊☺☺😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.