शिक्षक दिन यावर निबंध

शिक्षक दिन यावर निबंध


शिक्षक दिन

          गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती एक महत्त्वाचं आणि पवित्र असा भाग आहे. जीवनात आई - वडिलांचा स्थान कोणी घेऊ शकत नाही,कारण तेच आपल्याला या रंगबेरंगी सुंदर अशा जगात आणतात. आणि तेच आपले सर्व प्रथम गुरु असतात. तरीही शिक्षक हेच आपल्याला जीवनाचा खरं अर्थ शिकवतात . जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात.

        प्रतिवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दि न म्हणून साजरा केला जातो. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना च्या अवसर वर शिक्षकांच्या प्रति सन्मान प्रकट करण्यासाठी सर्व भारत भरात ५ सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु ' चां प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्व असतं.समाजात ही त्यांचा एक विशिष्ठ स्थान असतं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणा मधे खूप विश्वास ठेवत होते. ते ही एक महान तत्वज्ञ आणि शिक्षक होते. त्यांना अध्यापनात गहरे प्रेम होते. एका आदर्श शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. या दिवशी देश भरात भारत सरकारच्या वतीने श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात.

       शिक्षक दिन दिवशी शाळेत शिक्षण बंद केले जाते. शाळेत सर्व विद्यार्थी एक उत्सव साजरा करतात. सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि गौरव केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक दोन्हीही या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होतात. शाळा कॉलेज सोबत अन्य संस्थानामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम केले जातात. काही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम राबवले जातात. शिक्षक गुरु - शिष्य परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प केले जातात.


        गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती एक महत्त्वाचं आणि पवित्र असा भाग आहे ज्याचे अनेक उदाहरणं इतिहासात दर्ज आहेत. शिक्षक त्या माळी सारखं असतात, जे एका बागीच्याला वेगवेगळ्या सुंदर , मनमोहक अशा फुळांने सजवतात. जे शिष्याला कठीण परिस्थिति ही हसून पुढे वाटचाल करण्याची प्रेरणा देतात. आज सर्वांना शिक्षण देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीने केला जात आहे.

      आज गुरु शिष्याची परंपरा जरा कलंकित होताना दिसत आहे. येणाऱ्या दिवसात शिक्षका अथवा विद्यार्थी द्वारा होणाऱ्या दुर्व्य वहार अनेक बातम्या ऐकायला मिळतात. तरीही विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींचा दायित्व आहे की त्यांनी या महान परंपरेला उत्तम प्रतिने समजून एका चांगल्या समाजाला घडवण्याचा प्रयत्न आणि सहयोग दिला पाहिजे.


२ टिप्पण्या:

  1. शिक्षक दिन यावर खूप सुंदर आणि उपयोगी निबंध, एका विध्यार्थ्याच्या जीवनात एका शिक्षकाच महत्व काय असत हे या निबंधातून कळत, शिक्षकांचे महत्व सांगणारे काही सुविचार थे वाचा Click Here

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.