‌गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज



गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू पत्र / अर्ज
Application For Availing Bus Service



दिनांक :-   /       /              .

प्रति,
मा. प्रबंधक महोदय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ,


                         विषय :- गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करण्या हेतू निवेदन पत्र

महोदय,

         मी महाड गावात राहणारा एक रहिवाशी आहे. आमचं गाव हे मुख्य मार्गापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे,म्हणून आम्हाला दूरवर प्रवास करण्यासाठी नेहमी ६ किमी चालत यावं लागत, नंतर तिथून बस सेवा उपलब्ध होते. गावातून अनेक रहिवाशी तालुक्याला कामाला जातात. कॉलेज सुद्धा तालुक्याला आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान खूप अडचणी येतात. चांगले आणि मोठे इस्पितळ तालुक्याला असल्या मुळे आजारी रोग्यांना व्यायक्तिक वाहनांन शिवाय पर्याय नाही. या सर्व गोष्टी मुळे गावकरी , विद्यार्थी यांना रोजच खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. खाजगी सेवा देणारे तर खूपच प्रवास शुल्क आकारत असल्या कारणाने त्याचा रोज उपयोग करणे सुध्दा रहिवाश्यांना अशक्य आहे.

      तरी महोदय आपणास विनंती आहे की, आमच्या गावा पर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून रहिवाशांचे जीवन उद्धारेल. मुख्य मार्गापासून आमच्या गावा पर्यंत येणारी सडक पक्की आहे त्यामुळे वाहनांना अगदी सोईस्कर आहे. बस सेवा उपलब्ध झाल्यास नजदीक च्या गावांना सुद्धा त्याचा लाभ होईल. तसेच महामंडळाला नियमित भाडेही मिळेल.

     तरी लवकरात लवकर आपली प्रतिक्रिया कळवावी. आणि बस सेवा सुरू करावी. कळावे.

धन्यवाद !

आपला नम्र,
रमेश पाटील
महाड

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.