ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत विनंती पत्र

 ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत विनंती पत्र


प्रमोद सावंत
४२०, मोहसदन,
मुंबई


प्रति,
मा. व्यवस्थापक,
समस्त गणेश उत्सव समिती

      स न वि वि

                विषय :-   ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत


महोदय, 

         मी आपल्या परिसरात राहणार, इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सव साजरा होणार आहे. सालाबाद प्रमाणे आपण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो.सामाजिक बांधिलकी साठी असे उत्सव साजरे झालेच पाहिजे त. या निमित्ताने युवाशक्ती एकत्र येऊन अनेक लोकोपयोगी कामे करते. त्यामुळेच मी ही या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो पण..
        जेव्हा असे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात तेव्हा समाजातील सर्व घटकांना त्रास न होता समाधान, आनंद, कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमामध्ये ध्वनिवर्ध काचा वापर अटळ आहे; पण त्याचा त्रास आजारी, वृद्ध आणि विद्यार्थी यांना होणार नाही.हे सामाजिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. माझ्यासाठी तर हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. नेमकं गणेशोत्सवाच्या काळात आमची परीक्षा सुरू होत आहे. ध्वनिवर्धक च्या  आवाजाने अभ्यासात लक्ष लागणे कठीण आहे, तरी आपणास नम्र विनंती आहे की, ध्वनिवर्धक आवाज मर्यादित ठेवून मला सहकार्य करावे. 
        आपण माझ्या विनंतीचा नक्की विचार कराल अशी आशा बाळगतो.

आपला कृपभिलाषी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.